वातावरण बदलाचा गहू, तांदूळ उत्पादनाला फटका; १० टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याने भाववाढीची शक्यता

वातावरण बदलाचा देशाच्या तांदूळ आणि गहू उत्पादनाला फटका बसला असून या दोन्हींचे उत्पादन जवळपास ६ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
वातावरण बदलाचा गहू, तांदूळ उत्पादनाला फटका; १० टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याने भाववाढीची शक्यता
Published on

नवी दिल्ली : वातावरण बदलाचा देशाच्या तांदूळ आणि गहू उत्पादनाला फटका बसला असून या दोन्हींचे उत्पादन जवळपास ६ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वातावरण बदलाचा मोठा फटका मच्छिमारांनाही बसत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरील पाणी गरम होत असल्यामुळे माशांना खोल समुद्रातील थंड पाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. २०२३-२४ या पीकवर्षात भारतातील गव्हाचे उत्पादन ११३.२९ दशलक्ष टन इतके निघाले होते, तर तांदळाचे उत्पादन १३७ दशलक्ष टन इतके होते. देशातील १.४ अब्ज लोकसंख्या ही तांदूळ आणि गहू या दोनच प्रमुख पिकांवर आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, यंदा वातावरणात बदल होत असल्याने गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घसरणार आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in