अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी

ढगफुटीच्या घटनेनंतर यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी
ANI
Published on

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण होवून अमरनाथ यात्रेला निघालेल्या १३ यात्रेकरूंच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त असून अजूनही ४० हून अधिक भाविक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य आहे. ढगफुटीच्या घटनेनंतर यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर ही ढगफुटीची घटना घडली आहे. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचे प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे २५ तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या साहित्याचे नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी,तसीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in