राम मंदिर, अयोध्या आमच्यासाठी राजकीय विषय नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्यातील शेवटचा दिवस होता, यावेळी त्यांनी अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार असल्याची घोषणादेखील केली.
राम मंदिर, अयोध्या आमच्यासाठी राजकीय विषय नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अयोध्या दौऱ्यातील शेवटचा दिवस असून यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "राम मंदिर, अयोध्या हा आमचा राजकीय विषय नाही. हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. विकासाची अनेक कामे होत आहेत. याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले पाहिजेत. आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. हा माझ्या आयुष्यातील सौभाग्याचा दिवस आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार असल्याची घोषणादेखील केली. "अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा अयोध्यामधील राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. राम जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळेच वलय जाणवले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मंदिराचे काम हे अतिशय वेगाने सुरु आहे." असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, "२०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेनेला मते दिली होती. पण, काही लोकांनी स्वार्थापोटी कौल नाकारला. सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला तिलांजली दिली." असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "माझ्या अयोध्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होतो आहे. ते मुद्दामहून टीका करत आहेत. खरं तर, काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जीच आहे. पण पंतप्रधान मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. पण काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज निर्माण करत आहेत." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in