१ ऑक्टोबरपासून सीएनजी-पीएनजी दरवाढ ?

गॅसच्या किमती वाढल्यामुळे सरकार १ ऑक्टोबरपासून देशातील गॅसच्या किमती वाढवण्याची घोषणा करू शकते
१ ऑक्टोबरपासून सीएनजी-पीएनजी दरवाढ ?
Published on

देशात महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना येत्या महिनाभरात आणखी एक झटका सहन करावा लागू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १ ऑक्टोबरनंतर देशात सीएनजी आणि पीएनजी (पाईप गॅस) महाग होऊ शकतात. याशिवाय खते आणि विजेच्या किमतीही वाढू शकतात. ३० सप्टेंबर रोजी सरकार घरगुती गॅसच्या किमतींचा आढावा घेणार आहे. जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किमती वाढल्यामुळे सरकार १ ऑक्टोबरपासून देशातील गॅसच्या किमती वाढवण्याची घोषणा करू शकते.

१ एप्रिल २०२२ रोजी नैसर्गिक वायूची किंमत ६.१०डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंत वाढवण्यात आली होती. १ऑक्टोबर २०२२ पासून पुन्हा ९ डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंतपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार खोल क्षेत्रातून काढलेल्या नैसर्गिक वायूची किंमत ९.९२ डॉलर्स प्रति एमएमबीटीयूवरून १२ डॉलर्स प्रति एमएमबीटीयूपर्यंत वाढवू शकते. नैसर्गिक वायूच्या किमतीत एक डॉलरने वाढ केल्यास सीएनजीच्या किमती ४.५ रुपये प्रति किलोने वाढतील.

logo
marathi.freepressjournal.in