CNG Price Hike: दिल्लीत सीएनजी दुसऱ्यांदा महागला

नवी दिल्ली येथील ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ने (आयजीएल) सीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ केली आहे.
CNG Price Hike: दिल्लीत सीएनजी दुसऱ्यांदा महागला
CNG Price Hike: दिल्लीत सीएनजी दुसऱ्यांदा महागला(Photo-X)
Published on

नवी दिल्ली: येथील ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ने (आयजीएल) सीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ केली आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा सीएनजीची वाढ झाली आहे. आता येथील सीएनजीचा दर ८०.०९ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

यापूर्वी गुरुवारीच सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. सीएनजी महागला असला तरी घरगुती स्वयंपाकघरात पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसचे दर मात्र अद्याप कायम ठेवण्यात आले आहेत.

सीएनजीचे नवे दर रविवारपासून तात्काळ प्रभावाने लागू झाले. गॅसच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यामध्ये झालेली मोठी घसरण यामुळे झालेला परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी ही किंमत सुधारणा करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in