कोल इंडिया २४ लाख टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा जारी करणार?

घरगुती कोळसा पुरवठयातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कोल इंडियाला कोळसा आयात करण्याचे आदेश दिले आहेत.
कोल इंडिया २४ लाख टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा जारी करणार?

देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडियाने २४ लाख टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा जारी केली आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोळसा पुरवठ्यासाठी ही निवीदा जारी केली जाईल.

या कोळशाचा अंदाजे मूल्य ३१०० कोटी रुपये आहे. घरगुती कोळसा पुरवठयातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कोल इंडियाला कोळसा आयात करण्याचे आदेश दिले आहेत. आयात कोळसाचा पुरवठा राज्य सरकारच्या ७ ऊर्जा उत्पादक कंपन्या व १९ स्वतंत्र ऊर्जा निर्मिती कंपन्या केला जाईल. या कंपन्यांमध्ये सेम्बकॉर्प एनर्जी, जेपी पॉवर, अवंता पॉवर, लँको, रतन इंडिया, जीएमआर, वेदांत पॉवर, जिंदल इंडिया आदींचा समावेश आहे.

पंजाब, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिलनाडु, झारखंड आणि मध्य प्रदेश आदी राज्यांना आयात केलेला कोळसा मिळणार आहे. कोल इंडिया जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीसाठी आणखी एक निवीदा जारी करणार आहे. कोल इंडियाच्या संचालक मंडळाने दोन आंतरराष्ट्रीय निविदा काढायला मंजुरी दिली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in