कोळसा उत्पादनात ६.५२ टक्के वाढ, जानेवारीमध्ये ९९. ७३ दशलक्ष टन उत्पादनाचा टप्पा गाठला

कोळसा मंत्रालयाने जानेवारी २०२४ मध्ये एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली असून, ते ९९.७३ दशलक्ष टन मेट्रिक टन वर (एमटी) पोहोचले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत कोळसा उत्पादन ९०.४२ एमटी इतके होते, म्हणजेच यात २०.३० वृद्धी दिसून येत आहे.
कोळसा उत्पादनात ६.५२ टक्के वाढ, जानेवारीमध्ये ९९. ७३ दशलक्ष टन उत्पादनाचा टप्पा गाठला

नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाने जानेवारी २०२४ मध्ये एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली असून, ते ९९.७३ दशलक्ष टन मेट्रिक टन वर (एमटी) पोहोचले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत कोळसा उत्पादन ९०.४२ एमटी इतके होते, म्हणजेच यात २०.३० वृद्धी दिसून येत आहे.

जानेवारी २०२४ मध्ये कोल इंडिया लिमिटेडचे उत्पादन ७८.४१ एमटी वर पोहोचले असून, जानेवारी २०२३ मधील ७१.८८ एमटी च्या तुलनेत यात ९.०९ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २३.२४ मध्ये देशाच्या एकत्रित कोळसा उत्पादनाने (जानेवारी २०२४ पर्यंत) ७८४.११ एमटी (तात्पुरती) इतकी लक्षणीय झेप घेतली असून, आर्थिक वर्ष २२-२३ मधील याच कालावधीच्या ६९८.९९ एमटी उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये १२.१८ टक्के वाढ दिसून येत आहे. कोल इंडिया लिमिटेडने जानेवारी २०२४ मध्ये ६७.५६ एमटी कोळसा रवाना करून उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. जानेवारी २०२३ मध्ये हा आकडा ६४.४५ एमटी इतका होता, म्हणजेच यामध्ये ४.८३ टक्के वाढ दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २३.२४ मधील (जानेवारी २०२४ पर्यंत) एकत्रित कोळसा पाठवणीचा आकडा ७९७.६६ एमटी (तात्पुरता) इतका होता. आर्थिक वर्ष २२-२३ मधील याच कालावधीतील ७१९.७८ एमटी कोळसा पाठवणीच्या तुलनेत यामध्ये १०.८२ टक्के इतकी प्रशंसनीय वाढ नोंदवली गेली आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत, कोळसा कंपन्यांकडे असलेल्या कोळसा साठ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, तो७०.३७ एमटी वर पोहोचला. ही वाढ ४७.८५ टक्के इतकी आकर्षक वार्षिक वृद्धी दर्शवत असून, कोळसा क्षेत्राची मजबूत कामगिरी आणि कार्यक्षमता अधोरेखित करते. त्याच बरोबर, औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील (टीपीपी) कोळशाच्या साठ्यामध्ये, विशेषत: डीसीबी म्हणून ओळखल्या गेलेल्या ठिकाणी, त्याच तारखेला १५.२६ टक्के च्या वार्षिक वाढीसह, ३६.१६ एमटी इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली.वरील आकडेवारी कोळसा क्षेत्राची लवचिकता आणि देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

logo
marathi.freepressjournal.in