कोळसा घोटाळा प्रकरण : माजी खासदार विजय दर्डा यांना चार वर्षाचा तुरुंगवास

दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे
कोळसा घोटाळा प्रकरण :  माजी खासदार विजय दर्डा यांना चार वर्षाचा तुरुंगवास

देशभर गाजलेल्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विदय दर्डा त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांनी चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निवृत्त कोळसा सचिव एच.सी गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एक क्रोफा आणि के सी समरीया यांना देखील याच प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जेएलडी यतवतमाळ यांनी १९९९ ते २००५ या काळात जे जुने ब्लॉक देण्यात आले होते. त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळात गैरमार्गाने कंत्राट मिळाल्याचा आरोप होता. युपीएच्या काळात जेवढे घोटाळे गाजले त्यात कोसळा प्रामुख्याने कोळसा घोटाळ्याचे नाव घेतले जात होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आाल होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मागील नऊ वर्षाच्या काळात आम्ही देखील अनेक वेदना भोगल्या आहेत, त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, असा युक्तीवाद विजय दर्डा यांच्या वतिने करण्यात आला होता. दर्डा हे काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते. तसंत संपूर्ण दर्डा कुटुंब हे मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in