'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक

केंद्र सरकारने २५ जुलै रोजी दिलेला शब्द न पाळल्याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) सोमवारी राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा सांगूनही सरकारने आंदोलकांवरील एफआयआरची यादी सादर केलेली नाही.
'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक
'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २५ जुलै रोजी दिलेला शब्द न पाळल्याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) सोमवारी राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा सांगूनही सरकारने आंदोलकांवरील एफआयआरची यादी सादर केलेली नाही.

सहसंयोजक सौरव दास आणि रत्ना सिंह यांनी सरकारवर तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एफआयआर रद्द करणे आणि नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्याच्या मागणीवर संघटना ठाम असून, आवश्यक पडल्यास पुन्हा शांततापूर्ण आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनाला यश

जयपूर : जयपूरजवळील रामपुरा (कंवरपुरा) येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या दबावाचा अखेर परिणाम झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यायी ठिकाणी हलविण्यात आले असून, जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीच्या जागी नव्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in