कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनलच्या (सॅट) निर्देशांनुसार, बाजार नियामक 'सेबी'ने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी एका फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे.
कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त
कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनलच्या (सॅट) निर्देशांनुसार, बाजार नियामक 'सेबी'ने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी एका फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे.

कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या सात उपकंपन्यांमधून ३,५३५ कोटी रुपयांचा निधी कंपनीच्या प्रवर्तकांशी संबंधित असलेल्या 'म्हैसूर अमॅलगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेड' कंपनीकडे बेकायदेशीररीत्या वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची नव्याने, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश सॅटने ५ नोव्हेंबर रोजी सेबीला दिले होते.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)