कडाक्याच्या थंडीचा करावा लागणार सामना, येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

दिवसाचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरात पावसाची शक्यता आहे.
कडाक्याच्या थंडीचा करावा लागणार सामना, येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

मुंबई : उत्तर महाराष्ट्रासह मध्य भारतात ५ ते ११ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, रात्रीचे तापमान कमी होऊ शकते, ज्यामुळे मध्य भारताचा काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग तसेच हरयाणा आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात थंडी वाढू शकते. त्याचप्रमाणे दिवसाचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरात पावसाची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in