बेळगाव (कर्नाटक): कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील कोंनूर या शांत गावातील मोहम्मद गयास साब बागेवाडी यांचे घर आता देशाभिमानाचे केंद्र बनले आहे. त्यांच्या सुनबाई कर्नल सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बाबत भारतीय सैन्याद्वारे दिलेल्या माहितीचे वृत्तवाहिन्यांवर प्रसारण झाल्यानंतर हे घर पाहुण्यांनी आणि शुभेच्छुकांनी भरले आहे. हे ऑपरेशन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आले होते.
कर्नल सोफिया कुरेशी या गयास साब बागेवाडी यांचे चिरंजीव ताजुद्दीन बागेवाडी यांच्या पत्नी आहेत. त्या 'आसियान प्लस मल्टिनॅशनल मिलिटरी एक्सरसाईज – फोर्स १८' मध्ये सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत. सध्या कर्नल कुरेशी यांची नियुक्ती जम्मू येथे असून त्यांचे पती झाशीमध्ये सेवेत आहेत.
माध्यमांशी बोलताना गयास साब बागेवाडी यांनी मोठा अभिमान व्यक्त करताना सांगितले की, “मला काल दुपारी सोफियाविषयी अधिक माहिती मिळाली. जेव्हा मी तिला टीव्हीवर पाहिले तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला.