
मेरठ : अभिनेता मुश्ताक खान अपहरण प्रकरणात बिजनौर पोलिसांनी शनिवारी ४ आरोपींना अटक केली, तर मेरठ पोलिसांनी लवीचा जवळचा मित्र अर्जुन कर्णवाल याला कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणप्रकरणी अटक केली आहे. अर्जुनकडून अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ कार आणि २ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खंडणीसाठी वापरलेला मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. अर्जुनने सांगितले की, लवी त्याला टास्क द्यायचा. कोणाचे अपहरण करायचे, किती खंडणी वसूल करायची. संपूर्ण कथा फक्त लवीलाच माहीत होती. लवीने त्याला जेवढे सांगितले तेवढेच त्याला माहीत होते. अर्जुनच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, मेरठ आणि बिजनौरमध्ये पकडले गेलेले सर्व गुंड फक्त लवीने दिलेल्या टास्कवर काम करत होते. खरा खेळ फक्त लवीच खेळत होता. त्यामुळे लवीच्या अटकेनंतर या दोन अपहरण प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.