LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
लासलगावसह चार तालुक्यांतील सिलिंडर पुरवठा ठप्प; ३० हजार गॅस ग्राहक त्रस्त, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
लासलगावसह चार तालुक्यांतील सिलिंडर पुरवठा ठप्प; ३० हजार गॅस ग्राहक त्रस्त, रास्ता रोको आंदोलनाचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २ हजार ८२० रुपये झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, ही दरवाढ १ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. या सुधारित दरांमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी स्वयंपाकाच्या इंधनाचा खर्च वाढणार आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरचे भाव मात्र स्थिर म्हणजेच कायम आहेत.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या दरांमुळे जून महिन्यात किमतींनी उच्चांक गाठला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलिंडर दरात कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी ते जून दरम्यान १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,३७३ रुपयांनी वाढून, १,७४०.५० रुपयांवरून थेट ३,११३.५० रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये घट करण्यात आली.

घरगुती एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम सर्वसामान्य कुटुंबांना १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ९४२ रुपये मोजावे लागणार असून, ताज्या सुधारणेमध्ये यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जेचा खर्च वाढल्यामुळे मार्च ते जून दरम्यान घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत प्रति सिलिंडर ८९ रुपयांची वाढ झाली होती. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे दरही स्थिर आहेत. मे महिन्यात दोन्ही इंधनांच्या दरात प्रति लीटर सुमारे ७.५० रुपयांची शेवटची वाढ करण्यात आली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)