कंपन्यांनी नियमांचे गांभीर्याने पालन करणे अपेक्षित; पेटीएमचे नाव न घेता आरबीआयचा सल्ला

आरबीआय गव्हर्नर म्हणाले, पेटीएमला सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र वारंवार नियम न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कंपन्यांनी नियमांचे गांभीर्याने पालन करणे अपेक्षित; पेटीएमचे नाव न घेता आरबीआयचा सल्ला

मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँक (PBBL) वर देशातील बँकिंग रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ जानेवारी २०२४ रोजी बंदी घातली होती. गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, नियमनच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्यांनी नियमांचे गांभीर्य आणि प्रक्रियांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्यांनी ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे. त्यावेळी त्यांनी पेटीएमचे नाव घेतले नाही. त्यांचा सल्ला केवळ पेटीएमच्या संदर्भातच नव्हे तर इतर फिनटेक कंपन्यांच्या संदर्भातही होता.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले, पेटीएमला सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र वारंवार नियम न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पेटीएमचे नाव न घेता ते म्हणाले की, जर सर्व नियमांचे पालन केले गेले असेल तर केंद्रीय बँक नियंत्रित कंपनीवर कारवाई का करेल? पेटीएम पेमेंट्स बँकेची वैयक्तिक बाब आहे. या प्रकरणात पेमेंट सिस्टमबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आरबीआय नेहमी नियमन कक्षेत येणाऱ्या कंपन्या योग्य पावले उचलतील याची खात्री करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in