महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

सीसीटीव्ही फूटेज घेण्याची अध्यक्षांना विनंती केली आहे
महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

नवी दिल्ली: लोकसभेतील एका महिला खासदारांच्या गटाने राहुल गांधी यांनी फ्लार्इंग किस देण्याचे असभ्य वर्तन केले असल्याची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

राहुल गांधी यांच्यापूर्वी संसदेत कोणत्याही प्रतिनिधीने असे स्त्रीद्वेष्टे असभ्य वर्तन केले नव्हते. हे देशातील जनतेचे कायदे करण्याचे पवित्र सदन आहे. याच सदनात महिलांची प्रतिष्ठा राखण्यासाठी कायदे केले जातात. तेच सदन सुरु असतांना हा माणूस उभा राहून स्त्रीद्वेष्टे वर्तन करतो. अशा व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे, असे स्मृती इराणी यांनी अध्यक्षांना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की राहुल यांच्या वर्तनातून त्यांना कुटुंबाकडून मिळालेली शिकवण दिसून येते. त्यांच्यावर कोणते संस्कार झाले आहेत हे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी राहुल यांच्यावर टिकेची झोड उठवली. तक्रारदार महिला गटाचे नेतृत्व करणाऱ्या केंद्रीय मंत्री व भाजप खासदार शोभा करंदाळजे म्हणाल्या, सर्व महिला खासदारांना फ्लार्इंग किस देउन राहुल गांधी सदन सोडून गेले. हे लोकसभा सदस्याचे निव्वळ गैर व असभ्य वर्तन आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही असे ज्येष्ठ सदस्य सांगत आहेत. असे नेतृत्व असते का? म्हणूनच आम्ही यांच्या विरोधात तक्रार केली असून सीसीटीव्ही फूटेज घेण्याची अध्यक्षांना विनंती केली आहे, असे करंदाळजे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in