काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना वर्षानुवर्षे फसवत आहेत; उत्तर प्रदेशचे मंत्री ओ. पी. राजभर यांचा दावा

काँग्रेस आणि विरोधी पक्ष वर्षानुवर्षे मुस्लिमांना फसवत आहेत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजाने सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा द्यावा...
काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना वर्षानुवर्षे फसवत आहेत; उत्तर प्रदेशचे मंत्री ओ. पी. राजभर यांचा दावा

मुंबई : काँग्रेस आणि विरोधी पक्ष वर्षानुवर्षे मुस्लिमांना फसवत आहेत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजाने सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सुहेलदेव भारतीय समाज पक्ष अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मंत्री ओ. पी. राजभर यांनी रविवारी केले.

राजभर यांनी दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, किमान १५ ते २० टक्के मुस्लीम भाजपला मतदान करणार आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी उत्तर प्रदेशातील सर्व ८० लोकसभा जागा जिंकेल. मुस्लिमांना फसवण्यात काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर समाजवादी पक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्ष आहे, असा दावाही त्यांनी केला.

राजभर यांचा एसबीएसपी हा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचा भाग आहे. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या वेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३८ टक्के मुस्लीम होते, परंतु काँग्रेसच्या ५० वर्षांच्या राजवटीत आता मुस्लिमांकडे एकही नोकऱ्या नाहीत. याला जबाबदार कोण. असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in