काँग्रेसच्या सहाव्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा

काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानात जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले आहे, तर जयपूर, पूर्व येथे सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
काँग्रेसच्या सहाव्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून त्यात ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, सहाव्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानात जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले आहे, तर जयपूर, पूर्व येथे सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

दरम्यान, दौसाचे आमदार मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचे नाव निश्चित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर चंद्रपूरमधून विजयी झाले होते. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात सुरेश धानोरकर यांचे निधन झाले. काँग्रेसने २३ मार्च रोजी ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आतापर्यंत काँग्रेसने ५ याद्यांमधून १८६ उमेदवार जाहीर केले होते. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून राजस्थानमधील ४ आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. अजमेर, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि तामिळनाडूतून तिरुनेलव्हेली या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. दरम्यान, अजमेरमधून रामचंद्र चौधरी तर कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in