
नवी दिल्ली: छत्तिसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरु केली असून सोमवारी कोअर कमिटीची स्थापना केली. या कमिटीच्या निमंत्रक पदावर कुमारी सेल्जा आणि निवडणूक प्रचार समिती अध्यक्षपदी चरण दास महंत यांची नियुक्ती करण्यात आली.
कोअर कमिटीत एकूण सात सदस्य आहेत. त्यात मुख्यमंत्री भुपेश बघेल, कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष दीपक बायजी, उपमुख्यमंत्री टी एस सिंगदेव, ताम्रध्वज साहू, शिवकुमार सहारिया यांचा समावेश आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी या समिती स्थापन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कॉंग्रेसच्या या राज्यातील निवडणूक प्रचार समितीत एकूण ७४ सदस्य असून त्यात मुखमंत्री बघेल, उपमुख्यमंत्री देव, ताम्रध्वज साहूख रविंदर चौबे, मोहमद अकबर, शिवकुमार धारिया, कावाकी लाखमा, प्रेमसार्इसिंग तेकम, आणि अनिला भेंडिया यांचा समावेश आहे. छत्तिसगढ मंत्री मोहन मकरम आणि उमेश पटेल याशिवाय राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, रणजीत रंजन, फुलो देवी नेताम, आणि केटीएस तुलसी यांचा देखील या समितीत समावेश आहे.
तसेच कॉंग्रेसने १५ सदस्यांची एक संवाद समिती देखील स्थापन केली असून अध्यक्षपदी रविंद्र चौबे यांची तर निमंत्रक पदी राजेश तिवारी आणि विनोद वर्मा यांची नियुक्ती केली आहे. तसेच सुशील आनंद शुक्ला यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २५ सदस्यांची एक प्रोटोकोल कमिटी देखील स्थापन करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी अमरजीत भगत यांची नियुक्ती केली आहे. शिवसिंग ठाकूर या समितीचे निमंत्रक तर अजय साहू समन्वयक आहेत. छत्तिसगढ मध्ये सध्या कॉंग्रेसचीच सत्ता आहे.