रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसचा बहिष्कार-सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसचा बहिष्कार-सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार

नवी दिल्ली : अयोद्धेतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेसने पक्षाने नाकारले आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही. भाजप आणि आरएसएस नेत्यांनी निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले, असा आरोप देखील काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश यांनी एका पत्रकात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण, राम मंदिराचे उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या २०१९ च्या निकालाचे पालन करताना आणि प्रभू रामाला पुजणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा आदर करताना, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टपणे आरएसएस आणि भाजप कार्यक्रमाचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in