घटनादुरुस्तीविना एक देश, एक निवडणूक अशक्य काँग्रेसचा दावा

काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक देश, एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करावीच लागेल
घटनादुरुस्तीविना एक देश, एक निवडणूक अशक्य काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक देश, एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करावीच लागेल. त्याशिवाय हे अशक्य आहे, असे मत सोमवारी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. तसेच संसदेच्या १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्ष संसदीय धोरण गटाची बैठक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता १० जनपथ येथे भरवणार आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील समविचारी विरोधी पक्षांची बैठक आपल्या निवासस्थानीच बोलावणार आहेत. तेव्हा संसदेच्या आगामी सत्रातील रणनीतीविषयी विचारविनिमय करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीच ही माहिती दिली आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी एक देश, एक निवडणूक हा देशाच्या गणराज्य पद्धतीवरच घाला आहे, असे मत व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in