काँग्रेसची क्राउडफंडिंग मोहीम सुरू - नागरिकांकडून देणगी गोळा करणार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला यंदा १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल कोणीही नागरिक पक्षाला नवीन अॅपच्या माध्यमातून १३८, १३८० किंवा १३,८०० रुपयांची देणगी देऊ शकतो.
काँग्रेसची क्राउडफंडिंग मोहीम सुरू - नागरिकांकडून देणगी गोळा करणार
PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी पक्षाच्या क्राउडफंडिंग मोहिमेची सुरुवात केली आणि लोकांना बेरोजगारी आणि वाढत्या खर्चाविरूद्धच्या लढ्यात सामील होण्यास सांगितले. पक्षाचे नेते आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश आणि खजिनदार अजय माकन यांच्या उपस्थितीत 'देशासाठी देणगी' मोहीम सुरू करण्यासाठी खर्गे यांनी आपल्या पगारातून १ लाख ३८ हजार रुपये दिले.

'आमच्या पक्षाच्या नेत्यांनी एक अॅप तयार केले आहे. हा खूप आनंदाचा दिवस आहे. मला असे वाटते की, काँग्रेस देशाच्या उभारणीसाठी पहिल्यांदाच सामान्य लोकांची मदत घेत आहे’, असे त्यांनी ही मोहीम सुरू केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मोहिमेचा एक भाग म्हणून, पक्षाला छोट्या देणगीदारांकडून पैसे मिळतील. जर तुम्ही श्रीमंतांवर अवलंबून राहून काम करत राहिलात, तर उद्या आम्हाला त्यांच्या कार्यक्रम आणि धोरणांना सहमती द्यावी लागेल. काँग्रेस गरीब, अनुसूचित जाती, मागासवर्गीयांच्या हितासाठी काम करत असून यापूर्वीही त्यांनी आम्हाला मदत केली आहे. 'डोनेट फॉर देश'च्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेची मदत घेऊन देशाला पुढे नेण्याचे काम करू. काँग्रेसला नेहमीच सर्वसामान्यांची मदत मिळाली. महात्मा गांधींनीही देशातील जनतेच्या मदतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. लोक स्वेच्छेने पुढे येतील आणि एक-दोन दिवसांत देणगी देतील, असे ते म्हणाले.

टिळक स्वराज्य फंडच्या धर्तीवर मोहीम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला यंदा १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल कोणीही नागरिक पक्षाला नवीन अॅपच्या माध्यमातून १३८, १३८० किंवा १३,८००  रुपयांची देणगी देऊ शकतो. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने टिळक स्वराज्य फंड नावाने निधी जमवला होता. त्या धर्तीवर 'देशासाठी देणगी' मोहीम सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in