राजनाथ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी; ऑपरेशन सिंदूर शहिदांबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान एकही जवान शहीद झाला नसल्याचे खोटे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केल्याचा आरोप करत, काँग्रेसने राजनाथ सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासोबतच, या संपूर्ण प्रकारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान एकही जवान शहीद झाला नसल्याचे खोटे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केल्याचा आरोप करत, काँग्रेसने राजनाथ सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासोबतच, या संपूर्ण प्रकारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

'ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा कोणीही जवान मारला गेलेला नाही अशा आशयाचे विधान जुलै २०२५ मध्ये राजनाथ सिंह यांनी केले होते. आता मात्र या मोहिमेतील शहिदांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. याबाबत कॉँग्रेसच्या माजी सैनिक विभागाचे प्रमुख कर्नल रोहित चौधरी (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजप सैनिकांच्या नावावर मते मागतो, पण प्रत्यक्षात त्यांचा अपमान करतो.

मे २०२५ मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. यामध्ये लष्कराचे ५ आणि हवाई दलाचा १, असे एकूण सहा जवान शहीद झाले होते. अलीकडेच या सहा जवानांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'च्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. ऑपरेशननंतर १३ महिन्यांनी ही नावे जाहीर करण्यात आली. या वादावर संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाने "योग्य वेळी" या जवानांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या स्मृतीचा नेहमीच सन्मान केला जाईल. याआधीही सरकारने स्पष्ट केले होते की, संरक्षणमंत्र्यांच्या जुलै २०२५ मधील संसदेतील भाषणाचा काही भाग चुकीच्या पद्धतीने अर्थ लावून सोशल मीडियावर पसरवला जात आहे.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्वरित राजीनामा द्यावा. संरक्षण मंत्र्यांविरुद्ध 'हक्कभंग प्रस्ताव' आणला जावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप खासदारांनी चुकीची माहिती पसरवल्याबद्दल जाहीर माफी मागावी, 'अग्निवीर' योजना पूर्णपणे रद्द करण्यात यावी आदी मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in