"तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलं, काहीतरी गडबड आहे..." मोदींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

Narendra Modi on Rahul Gandhi : "तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलं. म्हणजेच तुम्हाला जरूर चोरीचा माल टेम्पो भरभरून मिळाला आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीप्रातिनिधिक फोटो
Published on

करीमनगर, तेलंगणा : "तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलं. म्हणजेच तुम्हाला जरूर चोरीचा माल टेम्पो भरभरून मिळाला आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ तेलंगणातील करीमनगर येथील प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्पासाठी मतदान काल पार पडलं. त्यानंतर आता संर्वच राजकीय पक्षांनी चौथ्या टप्प्यातील मतदानावर लक्ष केंद्रीत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तेलंगणात आले येथे. येथे झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधीनी अंबानी-अदानींना शिव्या देणं, बंद का केलं, असा प्रश्न त्यांनी विचारला तसेच काँग्रेसला टेम्पो भरभरून पैसे मिळाले असतील, दावाही त्यांनी केला.

रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद का केलं?

तेलंगणातील करीमनगर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसचे शहजादे (राहुल गांधी) गेल्या पाच वर्षांपासून सकाळी उठल्यापासून एक माळ जपायला सुरुवात करायचे. जेव्हापासून त्यांचा राफेलचा विषय संपला, तेव्हापासून त्यांनी ही नवी माळ जपायला सरुवात केली. पाच वर्षांपासून हीच माळा जपायचे, पाच उद्योगपती, पाच उद्योगपती.... नंतर म्हणू लागले अंबानी-अदानी, अंबानी-अदानी...पाच वर्षांपासून ते हेच म्हणतायत...पण जेव्हापासून निवडणूका जाहीर झाल्यात तेव्हापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलंय.."

चोरीचा माल टेम्पो भरभरून तुम्ही मिळवलाय....

मोदी पुढे म्हणाले की, "मी आज तेलंगणाच्या धरतीतून विचारू इच्छितो, की शहजादेंनी (राहुल गांधी) घोषित करावे की निवडणूकीत अंबानी अदानींकडून किती माल घेतलाय? काळ्या धनाची किती पोती घेतलीत? टेम्पो भरभरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्यात का? काय सौदा झालाय? तुम्ही रातोरात अंबानी, अदानीला शिव्या देणं बंद केलंय. जरूर काहीतरी गडबड आहे. पाच वर्ष अंबानी-अदानीला शिव्या दिल्या आणि रातोरात शिव्या बंद झाल्या. म्हणजेच कोणता ना कोणता चोरीचा माल टेम्पो भरभरून तुम्ही मिळवलाय....याचं देशाला उत्तर द्यावं लागेल," असं मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in