भ्रष्टाचारात मोदी तरबेज - राहुल गांधी

सपाचे नेते यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीला वातावरण अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत तर भाजप जेमतेम १५० आकडा गाठण्यापर्यंतच मजल मारणार आहे.
भ्रष्टाचारात मोदी तरबेज - राहुल गांधी

गाझियाबाद : निवडणूक रोखे म्हणजे जगातील सर्वात मोठी खंडणी वसुली योजना होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात तरबेज आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.

सपाचे नेते यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीला वातावरण अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत तर भाजप जेमतेम १५० आकडा गाठण्यापर्यंतच मजल मारणार आहे.

लोकसभेची ही निवडणूक विचारसरणीची आहे, एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी घटना आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सरसावली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्याचे आपण पालन करणार असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in