‘नीट’बाबत संसदेत आवाज उठवणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन

‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे तुमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत संसदेत तुमचा आवाज म्हणून नेटाने काम करेन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले.
‘नीट’बाबत संसदेत आवाज उठवणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन
Published on

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे तुमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत संसदेत तुमचा आवाज म्हणून नेटाने काम करेन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले.

‘नीट’ वैद्यकीय परीक्षेत १५०० विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण (ग्रेस) दिल्याचे प्रकरण देशभरात गाजत आहे. त्यावरून ही परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेवर (एनटीए) जोरदार टीका होत आहे.

‘एक्स’वरून राहुल गांधी म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून आपण संसदेत आवाज उठवणार आहे. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराचा फटका २४ लाख विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत. हे गुण मिळवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते. या प्रकरणात पेपर फुटलेला नाही, असे सरकारचे तुणतुणे कायम आहे. या पेपरफुटी प्रकरणांची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. सरकारी यंत्रणा व शिक्षण माफियांच्या संगनमताने हे घडत आहे. त्याचा बीमोड करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मी खेळू देणार नाही!

आम्ही आमच्या जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांना ‘पेपरफुटी’पासून स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिले आहेत. भारतातील सर्व विद्यार्थ्यांना मी आश्वासन देतो की, मी संसदेत तुमचा आवाज बनेन. तुमच्या भवितव्याशी खेळू देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in