"पंतप्रधान मोदी म्हणजे..." काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ; भाजप आक्रमक

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना यावेळी प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका
"पंतप्रधान मोदी म्हणजे..." काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ; भाजप आक्रमक

कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशामध्ये आज काँग्रेसची प्रचारफेरी सुरु असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, "मोदी हे विषारी सापासारखे असून तुम्ही त्याला विष समाज किंवा नका समजू पण ते चाखले तर मारून जाल." त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना विषारी सापाची उपमा दिल्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर स्पष्टीकरण देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "मी पंतप्रधान मोदींबद्दल हे व्यक्तिगत विधान केले नाही. त्यांची विचारधारा सापासारखी आहे, असे मला म्हणायचे होते. जर तुम्ही विष चाखणार तर मृत्यू होणार, असे मला म्हणायचे होते." असे ते म्हणाले.

यावरून बिहारचे गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ट्विट केले की, "काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त विधान केले. विषारी साप अशी भाषा त्यांनी वापरली. पण विष तर काँग्रेसने रुजवले असून समाजात विषमतेचे विष, देशाच्या फाळणीचे विष, भ्रष्टाचाराचे विष, राजकारणात घराणेशाहीचे विष काँग्रेसने रुजवले आहे." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in