झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हवेत, नवीन चेहरे

२३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्काराची आणि जयपूरला जाण्याची धमकी १२ आमदारांनी दिली आहे.
झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हवेत, नवीन चेहरे

रांची : झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये पक्षाच्या चार आमदारांना मंत्री म्हणून समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस आमदारांच्या एका वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंत्र्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांची नियुक्ती न केल्यास २३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्काराची आणि जयपूरला जाण्याची धमकी १२ आमदारांनी दिली आहे.

झामुमो नेतृत्वाखालील आघाडीचे ८१ सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार (झामुमो-२९, १७ आणि एक राजद) आहेत. आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराज आमदार शुक्रवारी शपथविधी समारंभाआधी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in