Bharat Jodo : राहुल गांधींनी थांबवली भारत जोडो पदयात्रा; म्हणाले, 'जम्मू काश्मीरचे पोलीस...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात येऊन स्थगित करण्यात आली
Bharat Jodo : राहुल गांधींनी थांबवली भारत जोडो पदयात्रा; म्हणाले, 'जम्मू काश्मीरचे पोलीस...'
@ANI

काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव थांबवली आहे. अखेरच्या टप्प्यात असणारी ही पदयात्रा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये येऊन थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी सुरक्षा व्यवस्था अपुरी पडत असल्याचा सांगितले. एक पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली.

खासदार राहुल गांधी म्हणाले की, "पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आम्हाला कुठेच दिसत नाहीत. माझे सहकारी चालताना अस्वस्थ झाले. यामुळे मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझे इतर सहकारी अजूनही चालत आहेत. आम्हाला प्रवास करता यावा यासाठी पोलिसांनी गर्दी हाताळण्यासाठी व्यवस्था करणे महत्वाचे होते. माझ्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या सल्ल्याविरुद्ध जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला."

दरम्यान, ३० जानेवारी रोजी काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होणे अपेक्षित आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था मिळाल्यानंतर पुन्हा भारत जोडो यात्रा सुरु होईल, अशी माहिती काँग्रेसकडून दिली आहे. यापूर्वीही खराब हवामानामुळे ही यात्रा काहीकाळ थांबवण्यात आली होती. तसेच, आज यात्रेमध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला देखील सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in