राम मंदिराचे निमंत्रण नाकारून काँग्रेसचा हिंदू धर्माला विरोध

इतिहासाचे पान उलटाल तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राम मंदिराचे निमंत्रण नाकारून काँग्रेसचा हिंदू धर्माला विरोध

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर अभिषेक समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने भारताच्या संस्कृती आणि हिंदू धर्माला पक्षाचा अंतर्निहित विरोध उघडकीस आणला आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रति ‘इर्ष्या, द्वेष आणि हीन भावना’ या भावनांमुळे काँग्रेसची देशाला विरोध करण्यापर्यंत मजल गेली होती आणि आता देवालाही त्यांनी विरोध केला आहे. अयोध्येतील राम मंदिर हे भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक आहे, परंतु काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसाठी समान विचारसरणीचे अतिरेकी राजकारण अधिक महत्त्वाचे आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्रिवेदी यांनी नमूद केले की, मंदिर आणि बाबरी मशिदीचा समावेश असलेल्या जमिनीच्या वादातील मुस्लीम वकील इक्बाल अन्सारी यांनाही हिंदू धर्माची उदारता दर्शवणारे निमंत्रण देण्यात आले होते आणि त्यांनी ते स्वीकारले. परंतु काँग्रेसने मात्र बहिष्काराचा मार्ग निवडला आहे. असे सांगत त्रिवेदी यांनी देशासाठी ऐतिहासिक क्षणांमध्ये अडथळे निर्माण करण्याची मुख्य विरोधी पक्षाची प्रवृत्ती असल्याचा दावा केला.

जेव्हाही इतिहासाचे पान उलटाल तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन, जीएसटी लागू करणे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संसदेतील भाषण यासह अनेक कार्यक्रमांचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in