सेबीप्रमुखांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे २२ ऑगस्टला आंदोलन

हिंडेनबर्गप्रकरणी सेबी अध्यक्ष माधबी पुरी-बूच यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी येत्या २२ ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. तसेच अदानी प्रकरणाची ‘जेपीसी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सेबीप्रमुखांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे २२ ऑगस्टला आंदोलन
Published on

नवी दिल्ली : हिंडेनबर्गप्रकरणी सेबी अध्यक्ष माधबी पुरी-बूच यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी येत्या २२ ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. तसेच अदानी प्रकरणाची ‘जेपीसी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष व पक्षाचे राज्यातील प्रभारींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला. मोदी सरकारने सेबी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा व जेपीसी नेमावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.

महागाई, बेरोजगारीमुळे गरीब व मध्यमवर्गीयांची दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी देशभरात आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. तसेच मोदी सरकारने जातगणना करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे. पिकांसाठी कायदेशीर ‘एमएसपी’साठी पक्षातर्फे लढा सुरूच राहील.

logo
marathi.freepressjournal.in