Rahul Gandhi : तब्बल ३१ वर्षांनी राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा ; ठरले दुसरे काँग्रेस नेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा ही अंतिम टप्प्यात आली असून सध्या जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली आहे
Rahul Gandhi : तब्बल ३१ वर्षांनी राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा ; ठरले दुसरे काँग्रेस नेते
@ANI
Published on

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा ही अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दाखल झाली असून आज राहुल गांधी यांनी ऐतिहासिक लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीदेखील होत्या. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे दुसरे काँग्रेस नेते ठरले.

तसेच, १९९२मध्ये तब्बल ३१ वर्षांपूर्वी भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी याठिकाणी तिरंगा फडकावला होता. यादरम्यान, यावेळी जोशींसोबत नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

तब्बल ३१ वर्षांनी राहुल गांधी यांनी इतर काँग्रेस नेत्यांसमवेत वंदे मातरम गीत गायल्यानंतर लाल चौकशीत झेंडा फडकावला. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्याच्या बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी पुढे गेल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, १९९२ रोजी तत्कालीन वरीष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता. त्यावेळी मात्र काश्मीर घाटीमध्ये तणाव निर्माण झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in