देशात संपत्तीचे सर्वेक्षण करणार! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घोषणा

तेलंगणातील प्रचारसभेत 'जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क' या घोषणेबद्दल ते म्हणाले की, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास जनतेतील संपत्तीचे वितरण तपासायला आर्थिक व संस्थात्मक सर्वेक्षण केले जाईल. देशातील सर्वाधिक संपत्ती कुणाकडे आहे, याचे सर्वेक्षण करण्यासाठी एक वित्तीय संस्था स्थापन केली जाईल.
देशात संपत्तीचे सर्वेक्षण करणार! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घोषणा

हैदराबाद : देशात कोणाकडे किती संपत्ती आहे, याचे सर्वेक्षण करून त्याचे योग्य वाटप करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केली.

तेलंगणातील प्रचारसभेत 'जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क' या घोषणेबद्दल ते म्हणाले की, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास जनतेतील संपत्तीचे वितरण तपासायला आर्थिक व संस्थात्मक सर्वेक्षण केले जाईल. देशातील सर्वाधिक संपत्ती कुणाकडे आहे, याचे सर्वेक्षण करण्यासाठी एक वित्तीय संस्था स्थापन केली जाईल. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल गांधी यांनी हैदराबादमध्ये याबाबत प्रथमच भाष्य केले. यापूर्वी राहुल यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा शब्द दिला आहे.

ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास देशात ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याक समुदायातील किती जनता आहे, त्याचे सर्व्हेक्षण केले जाईल. तसेच संपत्तीचेही सर्व्हेक्षण केले जाईल. त्यानंतर संपत्तीचे समान वाटप करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले जाईल. ज्याची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के आहे. परंतु, या समाजघटकांना नोकरी नाही आणि मालमत्तेचा समान हक्क नाही, असे ते म्हणाले. ९० आयएएस अधिकारी देशाचे प्रशासन चालवतात. त्यामध्ये केवळ ३ ओबीसी, १ आदिवासी आणि ३ दलित आहेत. त्यामुळे देशातील नोकऱ्या आणि इतर लोककल्याणकारी योजनांना लोकसंख्येच्या घटकांनुसार समान वितरित केले जाईल. त्यासाठी देशातील जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in