राष्ट्रीय
काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घराणेशाही! दुसऱ्या यादीत नकुलनाथ, वैभव गेहलोत यांना उमेदवारी
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. ५ राज्यांतील ४३ उमेदवारांचा त्यात समावेश आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना छिंदवाडा येथून तिकीट दिले आहे, तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना जालौर येथून तिकीट दिले आहे. गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाट येथून तिकीट दिले आहे, तर ‘चुरू’तून राहुल कस्वां यांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने आसाम, मध्य प्रदेश व राजस्थानमधील ४३ नावांना मंजुरी दिली.