‘मोफत रेशन’ विरोधात काँग्रेसने तक्रार करावीच पंतप्रधान मोदी यांनी दिले आव्हान

आपल्याविरोधात उद्धटपणा करीत आणि अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात असले तरी आपण भ्रष्टाचाराविरोधात लढतच राहू
‘मोफत रेशन’ विरोधात काँग्रेसने तक्रार करावीच
पंतप्रधान मोदी यांनी दिले आव्हान

नवी दिल्ली : लोकांना रेशन विनामूल्य देण्याची योजना पाच वर्षांसाठी वाढविण्यावरून काँग्रेसला निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची असेल तर ते पाप त्यांनी करावेच, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण लोकांसाठी चांगले काम करतच राहू, असे सांगत काँग्रेसवर खोचक आणि बोचरी टीका केली.

मध्य प्रदेशातील दामोह येथील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. आपल्या या आश्वासनामुळे देशातील ८० कोटी गरीब लोकांना विनामूल्य रेशन पुढील पाच वर्षे मिळणार आहे, असे सांगत ते म्हणाले की, ‘‘लोकांनी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता दिली पण त्यांचे मुख्यमंत्री हे सट्ट्यात गुंतलेले आहेत आणि काळा पैसा निर्माण करीत आहेत. आपल्याविरोधात उद्धटपणा करीत आणि अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात असले तरी आपण भ्रष्टाचाराविरोधात लढतच राहू.’’

‘‘ काँग्रेसने गरीबांचा पैसा लुटला आहे. त्यांनी तसे खास यंत्र बनवले आहे आणि त्यांच्या सरकारने १०० रुपयांपैकी केवळ १५ रुपये लोकांपर्यंत पोहोचले गेले ८५ रुपये काँग्रेसच्या नेतयांना पोहोचले गेले. आमचे सरकार जेव्हा २०१४ मध्ये सत्तेत आले तेव्हा अशा गोष्टी घटल्या नाहीत. भ्रष्टाचाराचे सर्व टायर्स आपण पंक्चर केले आहेत,’’ असेही ते म्हणाले. तुम्हाला मध्य प्रदेश नष्ट करावयाचे आहे का, काँग्रेस ही मध्य प्रदेश नष्ट करण्याची हमी आहे, अशीही टीका करून लोकांनी आता भ्रष्टाचाराला धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अर्थव्यवस्था जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेऊ

पंतप्रधानपदाच्या आपल्या तिसऱ्या मुदतीत आपण देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in