नोटबंदीमुळे रोजगारांवर गदा; नवव्या वर्धापनदिनी काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला 'नोटबंदी'चा निर्णय तुघलकी व विनाशकारी होता. या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीय बेरोजगार झाले, तर एमएसएमई क्षेत्राला मोठा फटका बसला, अशी जळजळीत टीका काँग्रेसने केली.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश | संग्रहित छायाचित्र
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश | संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला 'नोटबंदी'चा निर्णय तुघलकी व विनाशकारी होता. या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीय बेरोजगार झाले, तर एमएसएमई क्षेत्राला मोठा फटका बसला, अशी जळजळीत टीका काँग्रेसने केली.

नोटबंदी आज नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसने या निर्णयावर सडकून टीका केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, मोदी सरकारने केलेल्या 'नोटबंदी'मुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आणि ती पुन्हा कधीच पूर्ववत झाली नाही.

कोट्यवधी भारतीयांचे रोजगार नष्ट झाले. व्यापार आणि एमएसएमई उद्ध्वस्त झाले. एकूण रोजगारात ९२ टक्के वाटा असलेले असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त झाले. काळा पैसा आणि बनावट नोटा कमी झाल्या नाहीत. 'कॅशलेस'घोषवाक्य अर्थहीन ठरले आणि ज्या २००० रुपयांची नोट तेव्हा आणली ती आता रद्द करण्यात आली आहेत, असे रमेश यांनी 'एक्स'वर सांगितले.

ते पुढे म्हणाले, 'नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा गतिमानपणा हरवला आणि ती पुन्हा कधीच सावरली नाही.

या निर्णयावर काँग्रेसने नेहमीच टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपवणे आणि दहशतवादाला निधी पुरवठा थांबवणे हे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे.

मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर करत ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि त्या कायदेशीर चलन राहणार नाहीत, असे घोषित केले होते.

नोटाबंदीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त ओ'ब्रायन यांनी 'एक्स' वर एक पोस्ट शेअर करताना, पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ तसेच संसदेमध्ये दिलेले स्वतःचे भाषण दोन्ही शेअर केले. यातील व्हिडीओमध्ये मोदींच्या भाषणाचा अंश दाखवला आहे. ज्यात त्यांनी नोटाबंदीनंतरच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी ५० दिवसांची मुदत मागितली होती. '३० डिसेंबरनंतर माझ्या कामात काही त्रुटी, चुका किंवा वाईट हेतू आढळल्यास देश जो शिक्षा देईल त्यासाठी मी तयार आहे,' असे मोदी म्हणाले होते.

'मी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध ठामपणे उभा आहे, परंतु मला सर्वसामान्य लोकांची विशेषतः लहान व्यापाऱ्यांची फार चिंता आहे. ते उद्या आवश्यक वस्तू कशा विकत घेतील ? हा आर्थिक गोंधळ आहे, भारतीय सामान्य जनतेवर सोडलेले संकट आहे,' असे ते म्हणाले.

भारतीयांची सर्वात मोठी फसवणूक - ओ'ब्रायन

२०१६ मधील नोटाबंदी म्हणजे 'भारतीयांची सर्वात मोठी फसवणूक' होती, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ'ब्रायन यांनी शनिवारी केला.

logo
marathi.freepressjournal.in