
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे. केंद्राने आणलेल्या अध्यादेशाचा आपकडून तीव्र विरोध केला जात आहे. यात आपला अनेक विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. आता या संघर्षात आम आदमी पक्षाला काँग्रेस पक्षाची साथ मिळाली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणूगोपालदास यांनी केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
केंद्राने आणलेल्या अध्यादेशाविरोधात काँग्रेस पक्षाने आपली भूमीका स्पष्ट केली आहे. केसी वेणूगाोपाल यांनी दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या अध्यादेशाला संसदेत काँग्रेस विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे नेते अरविंद केजरीवाल हे मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेसकडे या विधेयकाविरोधात पाठिंबा मागत होते.
काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये केंद्रातील भाजपा सरकारविरोधात एकमुठ बांधण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह आणि राघव चढ्ढा हे सहभागी झाले होते. यानंतर आम आमदमी पक्षाने विरोकांपासून स्वत:ला लांब केले होते. आता पुढच्या आठवड्यात विरोधी पक्षाची दुसरी बैठक पार पडणार असून काँग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर न केल्यास विरोधकाच्या बैठकीला हजर राहणार नसल्याचे आपकडून जाहीर करण्यात आलं होतं. पण आता काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केल्याने बंगळूर य़ेथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत आम आदमी पक्ष सामील होणार आहे.