
गुजरात बरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या 68 जागांसाठी 412 उमेदवार रिंगणात आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 75.6 टक्के मतदान झाले होते. या राज्यात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होते. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (8 डिसेंबर) मतमोजणी सुरू असून येथे कोणाची सत्ता येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भाजपसाठी मते मागितली. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही या राज्यात जोरदार प्रचार केला. एक्झिट पोलनुसार भाजपला 24 ते 34 तर काँग्रेसला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या.