काँग्रेस घटक संघटनांवर जबाबदारी सोपवणार; मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती

इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात काही निर्णय घेतले आहेत. त्यादृष्टीने ही पुढील कार्यवाही असणार आहे.
काँग्रेस घटक संघटनांवर जबाबदारी सोपवणार;
मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती
PM

कलबुर्गी : लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विविध घटकांवर जबाबदारी सोपवण्यासाठी १० जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी आपण दिल्लीत जात आहोत. पक्षातील विविध घटकांसमवेत ही बैठक निवडणुकीतील कामाच्या दृष्टीने होत आहे, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी दिली.

इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात काही निर्णय घेतले आहेत. त्यादृष्टीने ही पुढील कार्यवाही असणार आहे. ते म्हणाले की, पक्षाने मतदारसंघात ५०० हून अधिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाने जिल्हानिहाय निरीक्षकही नेमले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, उमेदवारांची निवड कशी करायची यावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी कर्नाटकातही बैठक होणार आहे. इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारची कामे झाली आहेत.

मालदीववरून पंतप्रधानांवर टीका

मालदीव संबंधात सोशल मीडियावर नुकत्याच झालेल्या वादावर खर्गे यांनी मोदींवर प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरीत्या घेतल्याचा आरोप केला. भारताला आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. असे सांगून काँग्रेस प्रमुख म्हणाले की, राष्ट्रे त्यांचे शेजारी बदलू शकत नाहीत. बांगलादेश मुक्तीसाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध लढा दिला. असे सांगून त्यांनी ही बाब सर्वात वाईट परिस्थितीत देश लढतात, असे दाखला देत सांगितले, ‘‘मोदी कोणाला तरी मिठी मारतात आणि दुसऱ्याला चुकीचे म्हणतात. हे काही चांगले नाही.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in