काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.
काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

सिलीगुडी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासह एसयूव्हीवर बसून गांधींनी जलपायगुडी शहरातून प्रवास केला. ही यात्रा रात्री सिलीगुडीजवळ थांबेल, असे राज्य काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. सोमवारी ते बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in