'काँग्रेसची न्याय यात्रा' मणिपूरमधून आजपासून; ब्रेड-अँड बटरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार

काँग्रेस रविवारी हिंसाचाराचा फटका बसलेल्या मणिपूर येथून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे.
'काँग्रेसची न्याय यात्रा' मणिपूरमधून आजपासून; ब्रेड-अँड बटरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार

इंफाळ : काँग्रेस रविवारी हिंसाचाराचा फटका बसलेल्या मणिपूर येथून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेचे लक्ष वेधण्यासाठी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यासारख्या समस्यांवर काँग्रेस प्रकाश टाकणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधील १०० लोकसभा मतदारसंघातून जाईल. राहुल गांधींच्या आधीच्या क्रॉस-कंट्री मार्चप्रमाणेच ती परिवर्तनकारी ठरेल, असा पक्षाचा विश्वास आहे.सरकारने संसदेत लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी न दिल्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे आणि या उपक्रमाचा उद्देश न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची तत्त्वे पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे. ही निवडणूक यात्रा नाही यावर काँग्रेसने भर दिला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत खराब प्रदर्शनानंतर पक्ष आपले नशीब पुनरुज्जीवित करू पाहत असताना ती निर्णायक टप्प्यावर आली आहे.

भाजपने २२ जानेवारीच्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यावर लक्ष केंद्रित केल्याने, काँग्रेसला या यात्रेद्वारे ब्रेड-अँड-बटरच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकायचा आहे. गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते की, भावनिक मुद्द्यांचा राजकीयदृष्ट्या दुरुपयोग केला जात आहे आणि देशातील जनतेचा विश्वासघात करून वास्तव मुद्द्यांपासून लक्ष हटवले जात आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सांगितले आहे की, तरुणांना विचार करावा लागेल की आपल्या स्वप्नांच्या भारताची ओळख काय असेल? जीवनाचा दर्जा की फक्त भावना? प्रक्षोभक घोषणा देणारे तरुण की नोकरदार तरुण? प्रेम किंवा द्वेष?.

logo
marathi.freepressjournal.in