सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही ; ओडिसा उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वयोमर्यादा कमी करण्याच्या चर्चा जोर धरत असताना आता ओडिसा हाय कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ओडिसा उच्च न्यायालयाने बलात्काराच्या शिक्षेत १० वर्षापासून शिक्षा भोगत असेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला मुक्त केलं आहे. या व्यक्तीवर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेच वय त्यावेळेस १७ वर्ष होतं.
न्यायालयाने आरोपीचनी मुक्तता करताना रेकॉर्डवरील पुराव्यांवरुन तो बलात्कार असल्याचं सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. ओडिसा न्यायायलायने न्यायमुर्ती एस के साहू यांनी या प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की, तरुणी त्यावेळी १७ वर्षाची होती. ती आपल्या मर्जीने आरोपीसोबत जंगलातमध्ये जात होती. त्यांच्यात नियमित शारीरिक संबंध होतं होते. आरोपी विवाहित असून त्याला चार मुल असल्याचं मुलीला ठावूक होतं. मुलीने सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. मुलगी गर्भवती राहीली नाही तोपर्यंत तिला कोणताही आक्षेप नव्हता तसंच तिने याबाबत कोणाला काही सांगितलं देखील नव्हतं.
न्यामूर्ती साहू यांच्या मते, आरोपीने मुलीला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. हे लग्न होणार नसल्याचं देखील तिला माहिती होतं. कारण आरोपी आधीच विवाहित आणि पोराबाळांसोबत आहे. मुलीच्या वडिलांना आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५ वर्षानंतर १४ ऑगस्ट २०१८ साली सुंदरगडच्या न्यायालयाने आरोपीला बलात्कारी म्हणून दोषी ठरवलं होतं. २०१९ साली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावेळी न्यायालयाने सांगितलं की, जर पीडिता तिच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवले गेले असं सांगत असेल तर तो बलात्कार असू शकत नाही.