महागाईला कंपन्यांचे संगनमताचे व्यवहार कारणीभूत ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महागाईला कंपन्यांचे संगनमताचे व्यवहार कारणीभूत ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Published on

तेलापासून बिस्कीटपर्यंत सर्वच क्षेत्रात महागाईने हाहाकार माजवला आहे. या महागाईला कंपन्यांचे संगनमताचे व्यवहार कारणीभूत आहेत, असा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला.

भारतीय स्पर्धा आयोगाच्या १३व्या वार्षिक समारंभात त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, वस्तूंचा पुरवठा कमी होत आहे याच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. कंपन्या एकमेकांशी संगनमत करतात. त्याला कार्टेल म्हणतात. या अंतर्गत कंपन्या या उत्पादन, वितरण व विक्री व किंमत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. नियंत्रकांना ताबा व विलीनीकरण यांच्याबाबत बारकाईने माहिती पाहिजे.

त्या म्हणाल्या की, संगनमत करण्याच्या आव्हानाचा मुकाबला करणे गरजेचे आहे. अनेक पदार्थांच्या किंमत वाढीमागे विविध कारणे आहेत. तसेच पुरवठ्यात निर्माण होणारे अडथळ्यांच्या कारणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय स्पर्धा आयोगाबरोबरच कंपन्यांनाही संवेदनशीलपणे पाहायला हवे.

logo
marathi.freepressjournal.in