४.८ लाख घरांचे बांधकाम रखडले,ॲनारॉकचा अहवाल दिली माहिती

संशोधनासाठी ॲनारॉकने सात शहरातील २०१४ मध्ये शुभारंभ झालेल्या गृहप्रकल्पांचा अभ्यास केला आहे
४.८ लाख घरांचे बांधकाम रखडले,ॲनारॉकचा अहवाल दिली माहिती
Published on

देशातील आघाडीच्या आठ शहरातील ४.४८ लाख कोटी मूल्य असलेल्या ४.८ लाख घरांचे बांधकाम रखडले आहे. यंदा बिल्डर्सनी आतापर्यंत ३७ हजार घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे, अशी माहिती प्रॉपर्टी कन्सलटंट ॲनारॉकने आपल्या अहवालात दिली आहे.

आपल्या संशोधनासाठी ॲनारॉकने सात शहरातील २०१४ मध्ये शुभारंभ झालेल्या गृहप्रकल्पांचा अभ्यास केला आहे. या सात शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर विभाग (एमएमआर), कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे यांचा समावेश आहे. अहवालानुसार सात शहरातील ३६,८३० रखडलेल्या घरांचे बांधकाम जानेवारी २०२२ ते मे २०२२ या कालावधीत पूर्ण करण्यात आले. मे २०२२ अखेरीस ४,४८,१२९ कोटी मूल्य असलेल्या ४,७९,९४० युनिटस‌्चे बांधकाम विविध टप्प्यात रखडले आहे. या सात शहरातील मालमत्ता बाजारपेठेत कॅलेंडर वर्ष २०२१ च्या अखेरीस ४.८४ लाख कोटी मूल्य असलेल्या ५.१७ लाख घरांचे बांधकाम रखडले होते.

logo
marathi.freepressjournal.in