NEET UG: भौतिकशास्त्राच्या पेपरमधील वादग्रस्त प्रश्नाचे केवळ एकच उत्तर योग्य, आयआयटी-दिल्लीच्या तज्ज्ञांचा निर्वाळा

‘नीट-यूजी’च्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या भौतिकशास्त्राच्या पेपरमधील वादग्रस्त प्रश्नाचे केवळ एकच उत्तर योग्य आहे, असा निर्वाळा आयआयटी-दिल्लीच्या तीन सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

‘नीट-यूजी’च्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या भौतिकशास्त्राच्या पेपरमधील वादग्रस्त प्रश्नाचे केवळ एकच उत्तर योग्य आहे, असा निर्वाळा आयआयटी-दिल्लीच्या तीन सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिला.

भौतिकशास्त्राच्या पेपरमधील एक विशिष्ट प्रश्न तपासावा आणि त्याबाबतचा अहवाल मंगळवार दुपारपर्यंत सादर करावा, असा आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सोमवारी आयआयटी-दिल्लीच्या संचालकांना दिला होता.

आयआयटी-दिल्लीचा अहवाल प्राप्त झाला आहे. संस्थेचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी आदेशानुसार भौतिकशास्त्र विभागातील तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. त्यांनी वादग्रस्त प्रश्न तपासला आणि त्या प्रश्नासाठी जे पर्याय देण्यात आले होते, त्यापैकी चार क्रमांकाचा पर्याय हे योग्य उत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in