परमहंस आचार्यांचं पुन्हा वादग्रस्त विधान! स्टॅलिन यांचं शीर उडवणाऱ्याला केलं १० कोटींचं बक्षिस जाहीर

त्यांच्या या घोषणेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
परमहंस आचार्यांचं पुन्हा वादग्रस्त विधान! स्टॅलिन यांचं शीर उडवणाऱ्याला केलं १० कोटींचं बक्षिस जाहीर
Published on

सनातन धर्माबद्दलच्या वादातून पुन्हा एकदा वादग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी एक विधान केलं असून त्यामळे पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचं डोक जो उडवेल त्याला १० कोटी रुपयांच बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी केली. या विधानामुळं आता हा नवा वाद पेटण्याची शक्यता असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

अयोध्येतील तपस्वी छावणी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य म्हणाले, " उदयनिधी स्टॅलिन यांचं शीर कापून माझ्याकडं आणणाऱ्याला मी १० कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करतो. त्याला १० कोटी भेटतील. जर कोणामध्ये स्टॅलिन यांना मारण्याची हिंमत नसेल तर मी स्वतःचं जगातील कुठल्याही कोपऱ्यातून त्यांना शोधून काढून मारुन टाकेन", असं कठोर वादग्रस्त विधानही त्यांनी केलं आहे.

निवारी सनातन निर्मुलन कार्यक्रमात बोलताना तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, "सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्याविरोधात आहे. त्यामुळं काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही तर तो नष्टच केला पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया, मच्छर आणि कोरोनाला कधी विरोध करु शकत नाही, या गोष्टी संपवाव्याच लागतात".

परमहंस आचार्यांनी याआधी देखील रामचरितमानसवर टीका करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचं शीर कापणाऱ्याला तसेच पठाण सिनेमात दिपिका पादुकोननं परिधान केलेली बिकीनी ही भगव्या रंगात दाखवल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानला जिवंत जाळणाऱ्याला रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. "सनातन धर्माची सुरुवात नाही आणि अंतही नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि होणारही नाही", असंही आचार्यांनी यावेळी म्हटलं.

logo
marathi.freepressjournal.in