अभिनेत्री साई पल्लवीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद

तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे
अभिनेत्री साई पल्लवीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद
Published on

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘विराट पर्वम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान या अभिनेत्रीने एका मुलाखतीत काश्मिरी पंडित आणि मॉब लिंचिंगबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. साईने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्यांची तुलना मॉब लिचिंगशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे.

ग्रेट आंध्र न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साई म्हणाली, माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे. माझे कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारे कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचे हत्याकांड, त्यांचा नरसंहार दाखवला गेला आहे. तर हिंसा आणि धर्माचे मापदंड केले गेले तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला मारहाण करत त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्यास सांगण्यात आले, ही सुद्धा धर्माच्या नावावर झालेली हत्या आहे. काश्मीरमध्ये जे घडले त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत, असे साई म्हणाली आहे. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in