कोरोना हवेतून पसरतो; डब्ल्यूएचओकडून स्पष्टीकरण

खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता,
कोरोना हवेतून पसरतो; डब्ल्यूएचओकडून स्पष्टीकरण

कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओनेही याला दुजोरा दिला आहे.

कोविड विषाणू हा मुख्यतः वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो. खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता, मात्र वैज्ञानिकांच्या एका टीमने केलेल्या संशोधनातून कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हवेतील लहान कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ लिन्सी मार यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेकडे ठेवण्यात आला होता. वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे.

कोरोना विषाणू हा हवेतून पसरतो, ही माहिती आता त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर समाविष्ट केली आहे. २०२०मध्ये जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. भारतात मार्च २०२०मध्ये कोरोना आल्यानंतर पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. लसीकरणामुळे कोरोनाची लाट आटोक्यात आली, मात्र नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. आता तर कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in