
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ३००० संख्या ओलांडली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३३६ जण बाधित आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा क्रमांक आहे. देशात ३३९५ सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासांत दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. देशातील कोविड-१९ स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशात २२ मे रोजी २५७ सक्रिय रुग्ण होते, २६ मे रोजी ही संख्या १०१०१ इतकी झाली, तर शनिवारी ती संख्या ३३९५ वर पोहोचली. गेल्या २४ तासांत ६८५ नवे रुग्ण आढळले आणि चार जणांचा मृत्यू झाला.