आगीत दाम्पत्यासह तीन मुलांचा जळून मृत्यू

पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले.
आगीत दाम्पत्यासह तीन मुलांचा जळून मृत्यू

बरेली : फरीदपूर येथे शनिवारी रात्री एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. बरेलीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होते. रविवारी सकाळी घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले. अजय गुप्ता (३८), त्यांची पत्नी अनिता (३६), मुले दिव्यांश (९), दक्ष (३) आणि मुलगी दिव्यांका (६) अशी त्यांची नावे आहेत. आग कशी लागली, याचा शोध चालू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून अंत्यसंस्काराचा सर्व खर्च सरकार करणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in